Share

सरकारचे वरातीमागून घोडे, शेतकऱ्यांनी कापूस विकल्यावर दरामध्ये वाढ

Published On: 

जालना : प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या आशेने कापसाचे उत्पादन घेतले. पण कापूस वेचणीला आल्यावर मजुरांना वेचणीचा अवाजवी भाव द्यावा लागला. त्यातच परतीच्या पावसानेही ऐनवेळी फटका दिल्याने कापसाची गुणवत्ता ढासळली आहे. अशा विविध संकटाना सामोरे जात शेतकऱ्यांनी कापूस घरात आणला. गरज असल्याने अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस विकला. पंरतु आठ दिवसांपासून कापसाच्या दरात वाढ झाली आहे. ४ हजार २०० रुपये विकला जाणारा कापूस आता गुणवत्तेनुसार ५ हजार ९०० रुपये दरापर्यंत विकला जातोय. पण शेतकऱ्यांचा कापूस विकल्यानंतरच दरवाढ झाल्याने शेतकरी हताश असून यातून नेमका कोणाचा फायदा होतोय याची देखील चर्चा सुरू झाली आहे.

कापसाचे पिक हातात यायच्या काळात परतीच्या पावसाने तालुक्यात धूमाकूळ घातल्याने खरिपाचे होत्याचे नव्हते झाले. ज्या शेतकऱ्यांनी ठिंबकद्वारे मे महिन्यात कपाशीची लागवड केली होती त्या कपाशीच्या बोंड्या तर पूर्णतः सडल्याने त्या शेतकऱ्यांचे प्रंचड नुकसान झाले होते. शिवाय ज्या कपाशीला कापुस लागलेला होता त्या कापसाच्या देखील पावसामुळे वाती तयार झाल्याने कापसाची गुणवत्ता देखील घसरली. त्यामुळे बाजारपेठत देखील व्यापारी कापुस खराब असल्याचे कारण पुढे करीत भाव पाडून मागत होते.

शेतीसाठी लावलेला खर्च देखील निघणे यंदा महाग झाला आहे. मागील काळात बाजारात ४८०० ते ५००० रुपयापर्यंत कापसाची खरेदी केली जात होती. शेतकऱ्यांना देखील पैशाची गरज असल्याने मागेल त्या भावात शेतकऱ्यांनी कापुस विक्री केला. आता मागील आठ दिवसापासून कापुस ५७०० ते ५९०० रुपये प्रति क्विंटल दराने व्यापाऱ्यांकडून खरेदी केला जात आहे. पंरतु शेतकऱ्यांकडे आता घरात कापसाचे बोंड देखील शिल्लक राहीले नसल्याने भाववाढीचा काय फायदा असा सवाल शेतकरी उपस्थिती करु लागले आहे.

या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच अधिक आहे. कारण व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडुन कमी दरात कापसाची खरेदी करीत कापुस साठवुन ठेवला आहे. दरम्यान सध्या दहा ते बारा रुपये किलोप्रमाणे वेचणी दर शेतकऱ्यांना यावर्षी द्यावा लागला आहे. त्यात देखील मजुरांची मनधरणी शेतकऱ्यांना करावी लागत होती. परिणामी उत्पादनापेक्षा उत्पादन खर्च अधीक अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे पातेगळ झाल्याने कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!