Share

मनसेच्या मोठ्या बैठकीला राज ठाकरेंच्या स्नुषा मिताली ठाकरेंची उपस्थिती; चर्चांना उधाण !

Published On: 

मुंबई : राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात येत असून आता विविध प्रकारच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. नुकत्याच ग्रामपंचायती निवडणूक पार पडल्या. या निवडणुकांसाठी देखील मनसेने रणनीती आखली होती. आता येत्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेने जय्यत तयारी सुरु केली आहे.

दोन आठवड्यांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची महत्वपूर्ण बैठक पार पडली होती. यानंतर, आज पुन्हा एकदा राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक झाली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभयंकर, गजानन काळे, यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित आहेत. तर, बैठकीला राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे व स्नुषा मिताली ठाकरे या देखील उपस्थित राहिल्या आहेत.

पक्षाच्या मोठ्या बैठकीला मिताली ठाकरे यांनी उपस्थिती लावल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. आता त्यांचं देखील राजकीय क्षेत्रात पदापर्ण होणार का ? पक्ष त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवणार का ? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. मागील बैठकीतच राज ठाकरे यांनी विविध महापालिका व स्थानिक निवडणुकांसाठी प्रत्येक शहरानुसार टीम तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत मनसेची राज्यस्तरीय कोअर कमिटी तयार करुन, निवडणुकांची रणनीती आखली जाणार आहे. या कमिटीतर्फे निवडणूक हाताळल्या जातील. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!