🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. येत्या १ ते ९ मार्च दरम्यान राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पक्षाकडून केलं जात असल्याचं समजतं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेची आज दुसऱ्यांदा महत्वपूर्ण बैठक होत आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला राज्यातील मनसेचे सर्व बडे नेते उपस्थित आहेत.
राज ठाकरेंच्या या दौऱ्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी महत्वाचं विधान केलंय. ‘राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन आलो आहोत. त्यांनाही जावसं वाटत असेल तर त्यांनी नक्की जावं. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. विशेष म्हणजे, युतीच्या या गणितांबाबत भाजप नेत्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी वेळोवेळी थेट नकार दिला नव्हता.
मनसेची उत्तर भारतीयांविरोधाची भूमिका मवाळ झाली तर पुढचा विचार होऊ शकेल, असंही भाजपकडून विधान करण्यात आलं होतं. आता राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानं ही मनसे आणि भाजपच्या युतीची नांदी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- EMI भरण्यासाठी ‘या’ बँकेने दिली खास सुविधा !
- ‘तुम्ही कितीही सत्तेचा माज दाखवा पण ते शेतकरी आहेत तुमचा माज उतरवूनच जाणार’
- ट्रकच्या चाकाखाली आल्याने ९७ वर्षांची वृद्धा जागीच ठार
- कोरोना : सरकारकडून नवीन गाईडलाईन्स जारी, तर राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन कायम !
- भाविकांना दिलासा, तुळजाभवानी मंदिरात ३० हजार दर्शन पास
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

