Share

भाजपा पक्ष विनाशाच्या खाईत चाललाय, रक्षा खडसेंच्या आक्षेपार्ह उल्लेखावर अमोल मिटकरी संतापले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांचा भाजपाच्या वेबसाईटवर आक्षेपार्ह उल्लेख करण्यात आला आहे. याचा स्क्रीनशॉर्ट व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

BJP.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट आहे. सध्या या भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर रक्षा खडसे यांच्या नावापुढे कोणताही आक्षेपार्ह उल्लेख दिसत नाहीये. तो आक्षेपर्ह उल्लेख तत्काळ हटवण्यात आला असल्याची शक्यता आहे.

केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर संपूर्ण देशभरातील भाजपच्या सर्व खासदारांची यादी या वेबसाईटवर आहे. जेव्हा रक्षा खडसे यांच्या नावापुढील आक्षेपार्ह उल्लेखाचा स्क्रिनशॉर्ट पत्रकार स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर शेअर केला त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. हा सर्व प्रकार गुगल ट्रान्सलेशनमुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले आहे. रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे बद्दल भाजपाच्या अधिकृत पेजवर आक्षेपार्ह लिखाण असल्याचे समजले. परस्त्रीला आईचा दर्जा देणाऱ्या शिवरायांच्या शिकवणीला कलंक लावणारा भाजपा पक्ष विनाशाच्या खाईत चाललाय. पक्षात थोडीजरी नैतिकता शिल्लक असेल तर या प्रकरणावर थोडी तोंड उघडा असं मिटकरी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!