Share

कोरोना लस संपल्याने बीड जिल्ह्यात लसीकरण बंद

Published On: 

बीड : बीड जिल्ह्यात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे जिल्ह्याचील १२८ केंद्रांवर होत असलेले लसीकरण बंद करण्यात आले आहे. केंद्रावर तशा प्रकारची सुचना लावण्यात आल्या आहेत. सोमवारपर्यंत लस उपलब्ध होण्याची शक्यता असून काही केंद्रांवर कोविडशिल्डच्या दुसऱ्या लसीचा डोस दिला जात आहे.

राज्यभरात कोविड लसीचा तुटवडा जाणवत आहे. अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद आहेत. बीड जिल्ह्यात तब्बल १२८ केंद्रांवर कोविडची लस दिली जात आहे. प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यात अल्पावधीत लस उपलब्ध असल्याने या १२८ केंद्रांवरील लसीकरण तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. लसीच्या तुटवड्यामुळे हे केंद्र बंद करण्याची वेळ आरोग्य प्रशासनावर आली आहे. सोमवारपर्यंत लस उपलब्ध होईल त्यानुसार लसीकरण केंद्र सुरू होणार आहेत.

दरम्यान, रोज कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असतानाच मृत्यूचा आकडाही वाढत आहे. गेल्या २४ तासात बीड जिल्ह्यात ७६४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात आलेले आहेत. ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येतील तो भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषीत करावा, असे आदेश प्रशासनाचे आहेत. बीड शहरातील पाच भागात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!