🕒 1 min read
नवी दिल्ली : म्यानमारमध्ये ८ नोव्हेंबर २०२० रोजी निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आँग सान सू की यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल लील फॉर डेमॉक्रसी अर्थात NLD या पक्षाला अभूतपूर्व यश मिळालं. सू की यांच्या NLD या पक्षाला ४७६ पैकी तब्बल ३९६ जागा मिळाल्या.
लष्कराने पाठिंबा दिलेल्या युनियन सॉलिडॅरिटी अँड डेव्हलपमेंट या पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक निकालानंतर मतदार याद्यांमध्ये मोठी अफरातफर झाल्यानं असा निकाल लागल्याचा दावा म्यानमारच्या लष्करानं केला होता. त्यांनतर गेल्या दोन महिन्यांपासून १ फेब्रुवारीला म्यानमार सैन्याने सत्ता काबिज केल्यानंतर सैन्याने केलेल्या गोळीबारात शेकडो आंदोलकांचा बळी गेला आहे.
या प्रश्नावर संयुक्त राष्ट्रसंघात चर्चा घडून आली यावेळी भारताने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारताने म्यानमारच्या मुद्यावर लष्कराच्या हिंसक कारवायांचा निषेध करत संपूर्ण जगाने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा म्यानमारच्या अस्थिरतेचे परिणाम इतर देशांवरही होऊ शकतात,
संयुक्त राष्ट्रात भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी के नागराज नायडू यांनी म्यानमार प्रश्नावर बैठकीत म्हटले आहे की, भारत म्यानमारमधील हिंसाचाराचा निषेध करतो आणि जीव-संपत्तीच्या नुकसानीचा निषेध करतो. तिथे जे घडले ते होऊ नये. अशा वेळी अधिकाधिक संयम बाळगण्याची गरज आहे आणि मानवी मूल्य आणि हक्क पाळण्याचीही आपली जबाबदारी आहे.’
भारताची भूमी आणि समुद्र भाग म्यानमारबरोबरच्या सीमेला जोडली गेली आहे. म्यानमारमधील लोकांशी आमचे दीर्घकाळ मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तेथील राजकीय स्थिरतेबद्दल आम्हाला खूप चिंता आहे. अशावेळी परिस्थिती कशी नियंत्रणात आणली पाहिजे याचा निर्णय घेतला पाहिजे. त्याच ळी, शांततेचा तोडगा शोधला पाहिजे जेणेकरून तणाव आणखी वाढू नये, असे भारताचे प्रतिनिधी यांनी यावेळी स्पष्ट सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- तुळजाभवानी मंदिर संस्थान पुजाऱ्यांना पावले, किराणा साहित्य देण्याचा निर्णय
- लातूर जिल्हा; नागरिकांना घरी बसवण्यासाठी तहसीलदार उतरले रस्त्यावर
- हा कोरोनाचा नवा विषाणू आहे त्याला थांबवायचे असेल तर कडक निर्बंध आवश्यकच – उद्धव ठाकरे
- विनामास्क सामना पाहत बसलेल्या जय शाह यांच्यावर नेटीझंन्स भडकले, कारवाईची होतेय मागणी
- विराटच्या एका निर्णयावर युवराजची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

