🕒 1 min read
मुंबई : पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं २८ नोव्हेंबर रोजी निधन झालं. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे आज पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले. त्यादरम्यान पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह या ठिकाणी काही काळ थांबले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधत होते.
यावेळी त्यांनी बोलताना मोठे वक्तव्य केले आहे. जोपर्यंत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार, असं केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले म्हणाले आहेत तसेच सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून, महाराष्ट्राची बदनामी देशभर झाली आहे असे देखील रामदास आठवले म्हणाले आहेत.
दरम्यान भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेले भाजप नेते व विधान परिषद आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रचारामध्ये ते व्यस्त असताना त्यांच्यामध्ये कोरोनाचे लक्षणे आढळले होते. आता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भाजपला निवडणुकी आधी आणखी एक धक्का बसला आहे. दरम्यान, संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- तुळजाभवानी मंदिर संस्थान पुजाऱ्यांना पावले, किराणा साहित्य देण्याचा निर्णय
- लातूर जिल्हा; नागरिकांना घरी बसवण्यासाठी तहसीलदार उतरले रस्त्यावर
- हा कोरोनाचा नवा विषाणू आहे त्याला थांबवायचे असेल तर कडक निर्बंध आवश्यकच – उद्धव ठाकरे
- विनामास्क सामना पाहत बसलेल्या जय शाह यांच्यावर नेटीझंन्स भडकले, कारवाईची होतेय मागणी
- विराटच्या एका निर्णयावर युवराजची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

