Share

तुळजाभवानी मंदिर संस्थान पुजाऱ्यांना पावले, किराणा साहित्य देण्याचा निर्णय

Published On: 

उस्मानाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पुजारी बांधवांच्या मदतीला मंदिर संस्थान सरसावले आहे. गरजू पुजारी कुटुंबाला किराणा साहित्य पुरवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. मंदिर संस्थानने तिन्ही पुजारी मंडळांना पत्र पाठवून गरजू पुजारी कुटुंबीयांची माहिती तत्काळ मागवली आहे.

गेल्या वर्षभरापासून लाॅकडाऊन आणि संचारबंदीचा सामना करणाऱ्या पुजारी बांधवांवर मंदिर बंद करण्यात आल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थानने पुजारी बांधवांना किराणा साहित्य वाटप करण्याची मागणी जोर धरू लागली होती. यानंतर मंदिर संस्थानने तिन्ही पुजारी मंडळाला पत्र पाठवले असून, रेशन साहित्य वाटप करण्यासाठी गरजू पुजारी कुटुंबीयांची माहिती मागवली आहे.

राष्ट्रवादीने केली होती मागणी

कोरोनामुळे सलग दुसऱ्यांदा तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर बंद करण्यात आले आहे. त्यामुळे परंपरेने पुजारी व्यवसाय करणाऱ्या बांधवावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे व्यवहार पूर्ववत होईपर्यंत मंदिर संस्थानने पुजारी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रसने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानच्या अध्यक्षांकडे केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!