🕒 1 min read
मुंबई : आपल्या ट्विट आणि वादग्रस्त वक्त्यव्यामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मध्यंतरी कृषी कायदा संबंधित कंगनाने ट्विट केले होते. त्यांनतर बॉलीवूड मधील बऱ्याच कलाकारांनी कंगनावर निशाणा साधत खडेबोल सुनावले होते. त्यामध्ये तापसी पन्नू देखील होती. त्यांनतर कंगना आणि तापसीमध्ये बराच दिवस ट्विट वॉर सुरु होते.
मात्र, या दोघींमधले भांडण संपल्याचे दिसत आहे. अलीकडेच, तापसीला ‘थप्पड’ या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार घेताना, तापसीने तिच्या भाषणात बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींचे आभार मानले. ज्यामध्ये तिने कंगना रनौतचे नाव देखील घेतले आहे. या व्हिडिओवर कंगनाने देखील कंमेंट केली आहे.
हा व्हिडीओ एक नेटकऱ्याने ट्विटरवर कंगनाला टॅग करत शेअर केला आहे. या व्हिडीओत तापसीला फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर तिने तिच्या भाषणात कंगनाचे आभार मानल्याचे दिसत आहे. “आम्हाला सगळ्यांना आणखी मेहनत करायला भाग पाडण्यासाठी कंगना तुझे आभार. तुझ्या अभिनयाची उंची दिवसेंदिवस अशीच वाढत राहो”,असे तापसी त्या व्हिडीओमध्ये म्हणाली. तापसीने कौतुक केल्यानंतर कंगनाने तिला उत्तर दिले आहे. “धन्यवाद तापसी, तू विमल फिल्मफेअर अवॉर्डसाठी पात्र आहेस. यावर तुझ्या इतका दुसऱ्या कोणाचा हक्क नाही,” असे ट्विट कंगनाने केले आहे. हे ट्विट पाहून आता कंगना आणि तापसी मधील भांडण संपल्याचे दिसत आहे.
We know deep down sasti is #KanganaRanaut fan ✌????@KanganaTeam pic.twitter.com/1YHYYMUo67
— peets (@peetss_) April 9, 2021
महत्वाच्या बातम्या
- कोरोना नियमांचा वारंवार भंग करणाऱ्या नेत्याच्या सभांवर बंदी घालण्यास मागेपुढे पाहणार नाही – निवडणूक आयोग
- लातूर जिल्हा; नागरिकांना घरी बसवण्यासाठी तहसीलदार उतरले रस्त्यावर
- हा कोरोनाचा नवा विषाणू आहे त्याला थांबवायचे असेल तर कडक निर्बंध आवश्यकच – उद्धव ठाकरे
- विनामास्क सामना पाहत बसलेल्या जय शाह यांच्यावर नेटीझंन्स भडकले, कारवाईची होतेय मागणी
- विराटच्या एका निर्णयावर युवराजची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

