Share

रेमडेसिवीर प्रकरण; खा.सुजय विखेंच्या अडचणीत वाढ, ‘या’ अधिकाऱ्याकडे दिला तपास

Published On: 

अहमदनगर : भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगर जिल्ह्यासाठी गोपनीयरित्या रेमडेसिवीर आणले होते. दिल्लीतील एका कंपनीतून त्यांनी अहमदनगरसाठी खासगी विमानाने इंजेक्शन्स आणली. तो सर्व साठा संपल्यानंतर त्यांनी स्वत: फेसबूकवर व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे. आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेले आहे.

यावर राज्यात मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर तुटवडा असताना इंजेक्शन अनधिकृतपणे कोठून आणले, ते कथितरित्या वितरीत केल्याप्रकरणी हायकोर्टाने खासदार सुजय विखेंची नगर पोलिसांना चौकशीचे आदेश दिलेत. या प्रकरणाची चौकशी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूरचे पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्याकडे दिली आहे. संदीप मिटके हे प्रामाणिक व सोपविलेली जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण करणारे अधिकारी म्हणून पोलिस दलात ओळखले जातात.

तपासाची सूत्रे हाती घेताच डीवायएसपी संदीप मिटके यांनी तातडीने शिर्डी विमानतळ गाठत तेथील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. १० एप्रिल ते २५ एप्रिल २०२१ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहेत. राज्यातील बहुचर्चित खा. सुजय विखेंच्या रेमडेसीवीर वाटप प्रकरणात त्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने खा. विखे यांच्या समोरील अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. दि.२९ रोजी या प्रकरणात उच्च न्यायालयाने नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना चांगलेच फटकारले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!