Share

चर्चा काहीही होऊ द्या, ममताच जिंकणार – संजय राऊत

Published On: 

मुंबई – देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यापैकी हाय व्होल्टेज निवडणूक समजल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी टेन्शनमध्ये आल्या आहेत. भाजपाने कडवी टक्कर दिली असून सुरुवातीच्या कलांमध्ये एक आणि दोन आकड्यांच्या फरकाने तृणमूल पुढे असल्याचे दिसत आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. आठ टप्प्यांमध्ये ही निवडणूक पार पडली होती. ममता बॅनर्जींनी आपली सत्ता टिकवण्यासाठी, आणि मोदींनी सत्ता मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेले पहायला मिळाले. या आठही टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचारदेखील पहायला मिळाला. कोरोना काळातही मोदींच्या सभा, ममतांवर झालेला कथित हल्ला या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.

दरम्यान,निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आता प्रतिक्रिया येवू लागल्या आहेत.  तामिळनाडू आणि पुद्दुचेरी वगळता कोणत्याही राज्यात सत्तापरिवर्तन होणार नाही असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सत्ता बनवणार असा विश्वास संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. चर्चा काहीही होऊ द्या ममताच जिंकणार असून त्यांचा पराभव करणं शक्य नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!