मुंबई : १ मे पासून १८ वर्षांवरील व्यक्तींना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पण खासगी रुग्णालयात पैसै देऊन लस मिळणार आहे. शिवाय लसीकरणासाठी राज्याकडे आर्थिक अडचण आहे. म्हणून राज्यातील नागरिकांसाठी राज्यातील मोफत लसीकरणाला हातभार लावण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरीब कुटुंबांना दत्तक घेऊन त्या कुटुंबांच्या लसीकरणाचा खर्च उचलावा. लसीकरणाची ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
पटोले म्हणाले, राज्य सरकार वर्षभरापासून कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. केंद्र सरकारने आपली जबाबदारी झटकली असली तरी राज्य सरकारने १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. परंतु राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता मदतीचा ओघ वाढला पाहिजे. राज्यासमोर आर्थिक संकट असतानाही 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण करण्याचा सरकारने हाती घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हातभार लावावा, असे ते म्हणाले.
दरम्यान, केंद्रातील मोदी सरकारने कोरोनाची परिस्थिती अत्यंत निष्काळजीपणे हाताळली. सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे देशाची झालेली स्थिती पाहून देशाच्या जनतेला मरायला सोडले आहे का? असा संतप्त सवाल सर्वोच्च न्यायालयाने केल्याची आठवण यानिमित्ताने नाना पटोले यांनी करून दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील आणि पत्नी निर्मला पाटील यांचे एकाच दिवशी निधन
- चर्चा काहीही होऊ द्या, ममताच जिंकणार – संजय राऊत
- फक्त ‘या’ दोन राज्यांमध्ये सत्ताबदल होईल; संजय राऊत यांचा ‘पोल’ खरा ठरणार ?
- ‘आत्मनिर्भर होण्याचा उद्देश आहे, त्यामुळे देश अडचणीत असताना पंतप्रधान मदतीला येणार नाहीत’
- ‘देश संकटात राजकारणावर काय बोलायचे, कॉंग्रेस नेते आज टीव्हीवर बोलणार नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

