मुंबई : काही दिवसांपूर्वी कांदिवली पोलिसांनी एका चोराला पकडले. पण त्याला कोरोनाची लागण झाल्याने कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. पण त्या महाभागाने बायकोला भेटण्यासाठी सेंटरमधून पळ काढला. मात्र, पोलिसांनी त्याला २४ तासांतच अटक केली. या विचित्र प्रकारामुळे आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांची चांगलीच धांदल उडाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, कांदिवली पश्चिम येथे एका दुकानात काही दिवसांपूर्वी शटर तोडून चोराने रोख रक्कम आणि ड्राय फ्रुटसची चोरी केली. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीला जोगेश्वरी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडी केल्याचे पोलिसांना सांगितले. शिवाय अनेक ठिकाच्या घरात त्याने डल्ला मारला होता. त्याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी त्याची कोरोना तपासणी करण्यात आली. यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे उपचारासाठी कांदिवलीच्या साईनगर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले.
मात्र, या दरम्यान त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळ काढला. हा प्रकार तेथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. आरोपी हा त्याच्या पत्नीच्या संपर्कात असून तिला भेटायला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कांदिवली पोलिसांचे पथक जोगेश्वरी येथे गेले. पोलिसांनी आरोपीच्या पत्नीची मदत घेतली.
पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला सजमावून सांगितले की, तुमचा पती कोरोना पॉझिटिव्ह आहे. त्याला भेटलात तुम्हालाही कोरोनाची लागण होऊ शकते, असे सांगत त्यांची समजूत काढली आणि पोलिसांच्या पथकाने जोगेश्वरी परिसरात सापळा रचला. आरोपी हा पत्नीला भेटण्यासाठी आला असता पीपीई किट घालून फिल्डिंग लावून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले.
महत्त्वाच्या बातम्या
- काँग्रेस कार्यकर्त्यांनी गरिबांच्या लसीकरणाचा खर्च करावा, नाना पटोले यांचे आवाहन
- माजी नगराध्यक्ष रोहिदास पाटील आणि पत्नी निर्मला पाटील यांचे एकाच दिवशी निधन
- चर्चा काहीही होऊ द्या, ममताच जिंकणार – संजय राऊत
- फक्त ‘या’ दोन राज्यांमध्ये सत्ताबदल होईल; संजय राऊत यांचा ‘पोल’ खरा ठरणार ?
- ‘देश संकटात राजकारणावर काय बोलायचे, कॉंग्रेस नेते आज टीव्हीवर बोलणार नाहीत’


