खोपोली- खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, शिक्षण मंडळाचे माजी सभापती रोहिदास पाटील (६५) व त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका निर्मला पाटील (६०) यांचे आज एकाच दिवशी कोरोनामुळे निधन झाल्यामुळे खोपोलीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी ,सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रोहिदास पाटील व निर्मला पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास निर्मला पाटील यांचे उपचार सुरू असतानाच निधन झाल्याची बातमी धडकली. याबाबत माध्यमातून श्रद्धांजली व्यक्त होत असतानाच दुपारी दोन वाजता रोहिदास उर्फ नाना पाटील यांचेही निधन झाल्याची बातमी धडकल्यावर संपूर्ण शहर सुन्न झाले.
रोहिदास पाटील सलग ३५ वर्ष नगरसेवक होते. लौजी परिसरातून ते निवडून येत होते.त्यातील सलग पंधरा वर्ष ते नगर परिषद शिक्षण मंडळाचे सभापती होते.१९८५ साली त्यांनी खोपोली नगर परिषदेचे नगराध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका निर्मला पाटील या राज्याचे माजी राज्यमंत्री कै.बी.एल.पाटील यांच्या कन्या होत. पाटील पती-पत्नींचे एकाच दिवशी निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- फडणवीसांबाबत आक्षेपार्ह विधान; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पाच जणांविरोधात तक्रार दाखल !
- चर्चा काहीही होऊ द्या, ममताच जिंकणार – संजय राऊत
- दिलासा: आता प्राप्तिकर भरण्यासाठी ३१ मे पर्यंत मुदत
- ‘पुनावालांच्या आरोपांवर खरं-खोटं तपासण्याची गरज’, जितेंद्र आव्हाडांची मागणी
- औरंगाबादेत सर्व प्रतिबंधात्मक आदेशांना १५ मेपर्यंत मुदतवाढ, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

