Share

‘..तर अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील’, उत्तर कोरियाचा इशारा

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि उत्तर कोरियातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात दोन्ही देशांचे संबंध सुधारले होते. जो बायडेन ट्रम्प यांचा कित्ता गिरवतील अशी आशा होती. पण बायडेन प्रशासन उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनकडे साफ दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे किम जोंग हे अमेरिकेवर चांगलेच संतापलेत.

बायडेन यांनी गेल्या आठवड्यात संसदेतील आपल्या पहिल्या भाषणात उत्तर कोरिया आणि इराणचा परमाणू कार्यक्रम अमेरिका आणि जगाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक असल्याचे म्हटले होते. तसेच कूटनिती आणि मित्र देशांच्या मदतीने या समस्याचा सामना करण्यास अमेरिका तयार असल्याचे बायडन स्पष्ट केलं होतं.

यावर अमेरिकेला गंभीर स्थितीचा सामना करावा लागेल, असा इशारा उत्तर कोरियानं दिला आहे. उत्तर कोरियानं म्हटले आहे की, “अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी नुकत्याच केलेल्या भाषणात उत्तर कोरिया सुरक्षेच्या दृष्टीनं धोकादायक आहे असे म्हटले आहे. यामुळे शत्रुतापूर्ण नीतीचा हेतू व्यक्त करत मोठी चूक केली आहे. अमेरिकेला या सर्वांची मोठी किंमत मोजावी लागू शकते. भविष्यात अमेरिकेला खूप गंभीर स्थितीचा सामना करावा लागेल’ असा इशारा उत्तर कोरियाने दिलाय.

उत्तर कोरियाचे विदेश मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी क्वोन जोंग गुन म्हणाले की, अमेरिकेची उत्तर कोरियाबाबतची निती पुन्हा एकदा दिसून आली आहे. त्यानुसारच आम्ही पावले उचलणार आहोत. वेळ आल्यावर अमेरिकेला याची किंमत मोजावी लागेल, असं क्वोन म्हणाले. भविष्यात उत्तर कोरिया नेमकं कोणतं पाऊल उचणार याबाबत क्वोन यांनी काहीही स्पष्ट केले नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!