🕒 1 min read
सातारा: महाराष्ट्र सरकारने किराणामालाच्या दुकानात आणि सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे वाईन उद्योग आणि फळ उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होईल, असा दावा निर्णय घेताना करण्यात आला. त्यामुळे या निर्णयामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद रंगला. या निर्णयाला समाजातील विविध स्थरांवरून विरोध होत आहे. यात आता जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांची भर पडली आहे.
जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर त्यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करत, त्यांनी सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी ही वादग्रस्त विधाने केली आहेत. ते म्हणाले की, ‘सुप्रिया सुळे आणि पंकज मुंडे दारू पितात. आणि मी हे सिद्ध करू शकतो. माझं चालेंज आहे की सुप्रिया सुळेनीं मला खोट सिद्ध करून दाखवावं. त्या दारू पितात हे सिद्ध करण्यासाठी मला कोणत्या पुराव्यांची गरज नाही. त्याचे फोटो ढिगाने पडले आहेत. राजकारणात यायच्या अगोदर त्या रस्त्यावर दारू पिऊन पडलेल्या दिसायच्या.’
त्यांच्या व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करत, त्यांनी सरकारच्या वाईन विक्रीच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला आहे. यावेळी बोलताना बंडातात्या कराडकर यांनी ही वादग्रस्त विधाने केली आहेत. सुपरमार्केट आणि किराणामालाच्या दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
