मुंबई: एप्रिल महिन्यापासून सुरु होणाऱ्या सर्व खो खो स्पर्धांमध्ये संघ आता १५ खेळाडूंचा होणार आहे. एप्रिलपासून होणाऱ्या सर्व स्पर्धामध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे अशी माहिती आज भारतीय खो-खो महासंघाने दिली आहे. भारताच्या पारंपरिक खो-खो क्रीडाप्रकारात यामुळे संघात्मक पातळीवर बदल होणार आहे. त्यानुसार आता एप्रिल पासून सुरू होणाऱ्या नव्या मोसमापासून किशोर-किशोरी, कुमार-कुमारी आणि पुरुष, महिला अशा सर्व संघांत १२ ऐवजी १५ खेळाडूंचा एका संघात समावेश असणार आहे. एप्रिलपासून सुरु होणाऱ्या सर्व स्पर्धामध्ये याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, असे निर्देश खो-खो महासंघातर्फे सर्व राज्य संघाना देण्यात आले आहेत.
खो-खो खेळामध्ये जसा वेग आहे, तसा धोकाही अधिक आहे. खेळाडू जखमी होण्याचे प्रमाणही तसेच अधिक आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक खेळाडू जखमी झाल्यास पूर्वीच्या १२ खेळाडूंच्या संघरचनेत प्रशिक्षकांसमोर बदली खेळाडूंचे पर्याय कमी असायचे. या सर्व शक्यतांचा विचार करूनच खो खो महासंघाने आत एका संघात १२ ऐवजी १५ खेळाडूंना परवानगी दिली आहे. म्हणजेच आता खो खो सामना बघताना १२ ऐवजी १५ खेळाडूंचा एका संघात समावेश असणार आहे.खो खो खेळाडू जखमी होण्याचे प्रमाण आणि धोका लक्षात घेऊनच खो खो महासंघाने हा खेळाडूंची संख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय खो-खो महासंघाच्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महासंघाचे सहसचिव आणि महाराष्ट्र खो-खो संघटनेचे माजी सचिव डॉ. चंद्रजीत जाधव यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, आता त्याला खो खो महासंघाने मान्यता दिली आहे. यावर सविस्तर माहिती देताना राष्ट्रीय खो खो महासंघाचे पदाधिकाऱ्यांनी पुढील प्रमाणे माहिती दिली आहे, ” या निर्णयामुळे आता खो-खोचा संघ १९ जणांचा राहील. यात १५ खेळाडू (नऊ खेळणारे आणि सहा राखीव), प्रशिक्षक, व्यवस्थापक, सरावतज्ज्ञ आणि साहाय्यक मार्गदर्शक अशी संघरचना असेल. ’ महासंघाने केवळ खेळाडूंची संख्या वाढवली आहे. खेळाच्या नियमात आणि खेळण्याच्या पद्धतीत कुठलाही बदल केलेला नाही.
महत्वाच्या बातम्या :
- जनतेशी नाळ असलेला नेता, चोपदारच्या लेक-जावयाची केली विचारपूस
- डॅरेल मिचेलला आयसीसीचा एक आगळा वेगळा पुरस्कार
- ‘अमृतकाल में देश उस दौर से गुजर रहा है…’; अमोल कोल्हेंची केंद्रावर काव्यातून टीका
- अमिताभ बच्चन यांनी वडिलोपार्जित ‘सोपान’ बंगला २३ कोटीला विकला
- टाटा ओपन खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय जोडीची दमदार सुरुवात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

