मुंबई: माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीवर हवे, अशी थोरामोठयायांची शिकवण आहे. पण सर्वांनाच मात्र ते जमत नाही. काही राजकीय नेते हे कितीही मोठ्या पदावर गेले तरी आपला मतदारसंघ आपली माणसे विसरत नाहीत. तर काही एकदा निवडून आले की, पाच वर्षे मतदार संघात फिरकत नाहीत. अशीच मातीशी आणि माणसांशी नाळ असलेला लोकनेता म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार.
उपमुख्यमंत्री कार्यालयच्या बाहेर आपले कर्तव्य बजावत असलेल्या एका चोपदाराने पवारांकडे एक इच्छा प्रकट केली, ती म्हणजे त्या चोपदाराने आपल्या लग्न झालेल्या मुलीला आणि जवायला आपल्याला भेटायचे आहे असे सांगितले. आणि अजित पवारांनी क्षणाचाही विलंब न करता ती मान्य केली. सध्या अर्थसंकल्प आणि इतर कामाच्या रगाड्यात देखील दादांनी एका दिवसात त्यांना भेटण्याची वेळ आणि तारीख दिली आणि आपल्या सहकाऱ्याचे मन राखले.
विलास मोरे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते काही दिवसांतच सेवानिवृत्त होणार आहेत. दादांनी नुसती भेटच घेतली नाही तर, चोपदार कर्मचाऱ्यांची मुलगी आणि जावयाची आपुलकीने चौकशी देखील केली. विवाह कसा झाला ? लव्ह मॅरेज की, अरेंज मॅरेज ? हा प्रश्न विचारत उपस्थितांची मने जिंकली. त्यांचे हे आपलूलकीचे वागणे पाहून मुलगी आणि जावई भारावून गेले तर चोपदारांचे डोळे पाणावले.
महत्वाच्या बातम्या:
- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऐनवेळी कसोटी क्रिकेट सामन्याचे ठिकाण बदलले
- औरंगाबादेत हुल्लडबाजी तरुणाला भोवली; लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी ‘जेलवारी’..!
- स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकासोबत क्रिस गेलचा फोटो व्हायरल
- कितीही दबाव निर्माण केला तरी महाराष्ट्र सरकार झुकणार नाही- नवाब मलिक
- आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे औरंगाबाद जिल्ह्यात ‘शिवतेज’ अभियान!

