न्यूझीलंड क्रिकेट संघातील खेळाडू नेहमीच त्यांच्यातील भरभरून असलेल्या क्रिकेट प्रति प्रेमाबद्दल ,एकूणच खेळाडू वृत्तीबद्दल आणि शांत स्वभावाबद्दल ओळखले जातात. २०१९ च्या विषवकरंडकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा इंग्लंड विरुद्ध अगदी शेवटच्या चेंडूवर पराभव झाला होता तरी न्यूझीलंड संघ हसत्या चेहऱ्याने वावरत असलेला आपल्याला दिसला होता. त्याच न्यूझीलंड संघातील एका खेळाडूला आता आयसीसी चा क्रिकेट सद्भावना पुरस्कार प्राप्त झाला आहे.
न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरेल मिचेलला २०२१ वर्षांतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ‘क्रिकेट सद्भावना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात गेल्या वर्षी १० नोव्हेंबरला ट्वेन्टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीचा सामना झाला. या सामन्यात इंग्लंडने विजयासाठी न्यूझीलंडपुढे १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. या १६७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या आदिल रशीदने १८वे षटक टाकले होते. या षटकातील पहिल्या चेंडूवर जिमी निशमकडे स्ट्राइक होती. त्याने समोरच्या दिशेने चेंडू मारला आणि त्यांना सहज एका धावेची संधी होती.
मात्र, समोरील मिचेलने धाव घेण्यास नकार दिला. आपला रशीदला धक्का लागल्याचे वाटल्याने त्याने ही कृती केली होती. याच अप्रतिम खेळाडू वृत्तीमुळे डॅरेल मिचेलला या वर्षीचा आयसीसीचा ‘क्रिकेट सद्भावना पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार जिंकणारा तो न्यूझीलंडचा डॅनील विटोरी, केन विलियम्सन आणि ब्रॅंडन मॅकलम नंतरचा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे.
यावर प्रतिक्रिया देताना डॅरेल मिचेल म्हणाला कि,‘‘क्रिकेट सद्भावना पुरस्कार पटकावणे हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. न्यूझीलंडमध्ये आम्ही खिलाडूवृत्तीला महत्त्व देतो,’’
महत्वाच्या बातम्या :
- अमिताभ बच्चन यांनी वडिलोपार्जित ‘सोपान’ बंगला २३ कोटीला विकला
- खैरेला मी २ लाख मतांनी पाडला असता; हिंदूंच्या नावाने जन्मभर खासदार राहण्याची त्यांची इच्छा; हर्षवर्धन जाधवांची टोलेबाजी!
- टाटा ओपन खुल्या टेनिस स्पर्धेत भारतीय जोडीची दमदार सुरुवात
- U19WC: फायनलमध्ये पोहचल्यानंतर कर्णधार यशला वडिलांकडून मोलाचा सल्ला
- राज्यपालांच्या खासगी सचिवपदी सेवानिवृत्त अधिकारी नेमणे चुकीचे – नवाब मलिक


