Share

पुष्पाची क्रेझ काही थांबेना! मराठमोळा अभिनेता प्रशांत दामलेचा अल्लू अर्जुन स्टाइल व्हिडीओ, एकदा पहाच

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : साऊथचा लोकप्रिय सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) ‘पुष्पा’ (film ‘Pushpa’) या चित्रपटाची चर्चा सतत सुरू आहे. चित्रपटातील गाण्यांसह त्यातील स्टाईलने अनेकांना भुरळ घातली आहे. आता चक्क मराठमोळा अभिनेता प्रशांत दामले (Actor Prashant Damle) यांनी अल्लू अर्जुनच्या स्टाइलमध्ये व्हिडीओ शूट केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (viral on social media) होत आहे.

दरम्यान अभिनेता प्रशांत दामले यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समझे क्या फायर है में…’ असे अल्लू अर्जुनच्या स्टाइलमध्ये बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘काही तरीच होतय हे!!!’ असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधत आहे. सर्वसामान्यांसह लोकप्रिय अभिनेते, खेळाडूंसह विदेशी कलाकारांनी देखील हीच स्टाईल कॉपी करत व्हिडीओ बनवून शेअर केले आहे. या लिस्टमध्ये आता चक्क मराठमोळ्या अभिनेत्याला देखील मोहिनी घातली आहे, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/358089552514701

पुष्पा : ज राइज’ हा चित्रपट आता ओटीटीवर देखील प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या पुष्पा या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अल्लू अर्जूनच्या हटके स्टाईलने आजवर अनेकांना भुरळ घातले असून बऱ्याच सेलिब्रिटींनी यावर व्हिडीओ देखील शेअर केले आहेत. आज ही पुष्प चित्रपटाबाबत तेवढीच क्रेझ बद्दल प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!