Share

‘कॉंग्रेसला मत म्हणजे…’; अरविंद केजरीवालांची कॉंग्रेसवर टीका

Published On: 

नवी दिल्ली: देशात सध्या निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापत आहे. सध्या आता गोव्याच्या निवडणुका (Elections 2022) तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप देखील राजकीय नेत्यांचे सुरू आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घोषणा देखील जोरात सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे अध्यक्ष तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेसवर टीका केली आहे.

गोव्यातील जनतेला संबोधून बोलताना अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, गोव्यातील जनतेला आम आदमी पक्ष (AAP) आणि भाजपमध्ये (BJP) एक पर्याय आहे. जर तुम्हाला स्वच्छ, प्रामाणिक सरकार हवे असेल, तर तुम्ही ‘आप’ला मत देऊ शकता. दुसरा पर्याय म्हणजे भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मतदान करणे, असं यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. तसेच किनारी राज्यातील २०१७ च्या निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचा संदर्भ त्यांनी यावेळी दिला. १७ आमदारांसह निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या काँग्रेसकडे आता फक्त दोनच आमदार आहेत, असं केजरीवाल यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना अरविंद केजरीवाल कॉंग्रेसवर (Congress) टीका करताना म्हणाले, तुम्हाला स्वच्छ, प्रामाणिक सरकार हवे असेल, तर तुम्ही ‘आप’ला मत देऊ शकता. दुसरा पर्याय म्हणजे भाजपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मतदान करणे. अप्रत्यक्ष मतदान म्हणजे जेव्हा तुम्ही काँग्रेसला मत देता तेव्हा ते अप्रत्यक्षपणे मतदान करता, तो काँग्रेसचा माणूस जिंकेल आणि भाजपमध्ये जाईल, त्यामुळे कॉंग्रेसला मत म्हणजे भाजपला अप्रत्यकाश मत, असं केजरीवाल म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!