Share

‘वेतनाच्या समस्येवर तोडगा काढत एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा द्या’, फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाही. यामुळं मंडळाचे अनेक कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. वेतन वेळेवर होत नसल्यानं आर्थिक अडचणीत असलेल्या राज्य परिवहन मंडळांच्या चालकानं नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साक्री (जि.धुळे) येथे घडली. माझ्या आत्महत्येसाठी एसटी महामंडळाला जबाबदार धरावं, असं त्यांनी चिठ्ठीत नमूद केलं आहे.

याच अनुषंगाने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ‘अनियमित वेतनामुळे एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून या कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात फडणवीस म्हणाले की, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याने अनेक कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात आहेत. कुटुंबाचे अर्थचक्र संकटात सापडल्याने नाईलाजाने एस.टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे सुरू केले आहे. अहमदपूर, तेल्हारा, शहादा, कंधार आणि साक्री अशा अनेक ठिकाणी एस.टी. कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

यापूर्वी गेल्यावर्षी सुद्धा जळगाव येथे वाहक मनोज चौधरी आणि रत्नागिरी येथे पांडुरंग गडदे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर आपल्याशी पत्रव्यवहार केला होता. नाशिक आणि इतरही भागात त्यानंतर आत्महत्यांचे सत्र सुरूच राहिले. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे बेडसे या एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करताना लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वेतन मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे स्पष्टच लिहून ठेवले आहे. असे असताना परिस्थिती नीट न हाताळता संताप व्यक्त करणाऱ्या त्यांच्या संतप्त नातेवाईकांविरूद्धच पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या घटनेने राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या या व्यथांकडे तातडीने हस्तक्षेप करीत आपण लक्ष द्यावे. वेतनाच्या समस्येवर तोडगा काढावा आणि राज्यभरातील या कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. केवळ कर्मचारीच नाहीत, तर त्यांचे कुटुंबीय सुद्धा प्रचंड मानसिक आणि आर्थिक तणावाखाली आहेत. त्यामुळे आपल्या स्तरावर या गंभीर प्रश्नाची तात्काळ सोडवणूक करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रातून केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!