Share

आमदार ऋतुराज पाटील यांना कोरोनाची लागण

Published On: 

कोल्हापूर: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेत (Third Wave) सामान्य जनते सोबतच अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यात आता कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांचा देखील समावेश झाला आहे.

कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील (MLA Ruturaj Patil Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती पाटील यांनी ट्विट करून दिली आहे. नुकतीच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेत आहे. माझी प्रकृती चांगली आहे. कोरोनावर मात करून मी लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन. काळजी घ्या, सुरक्षित रहा, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

सध्या राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले आहे. तसेच मुंबई पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील घट बघायला मिळत आहे. असे असले तरी देखील अद्याप मास्कमुक्त महाराष्ट्र करण्याचा कुठलाही निर्णय झाला नसल्याचे टोपे यांनी सांगितले. तसेच राज्यात लागू असलेले निर्बंध हटवण्याबाबत देखील अद्याप निर्णय झाला नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!