Share

भाजप आणि माझं नातं वयाच्या नवव्या महिन्यापासून – पंकजा मुंडे

Published On: 

🕒 1 min read

बीड: स्वत:ची भाजपशी असलेली भावनिक जोड सांगत भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि गोपीनाथ मुंडेंच्या (Gopinath Munde) ज्येष्ठ कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पंकजा मुंडे बीडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, मी नऊ महिन्याची होते, तेव्हा पासून माझी आई मला साहेबांच्या प्रचार सभेत कडेवर घेऊन जायची, तेव्हा पासूनच मी भाजपचा प्रचार करत आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, अशा प्रचार सभेला मी कडेवर असताना आई सर्वांना सांगायची की, मुंडे साहेबांच चिन्ह कमळ आणि ही माझी मुलगी पंकजा, तेव्हा पासून मी भाजपचा प्रचार करत आहे, हे सांगतानाच त्यांना हे नाव कसं पडलं याचा देखील त्यांनी एक किस्सा सांगितला. पंकजा यांचे नाव त्यांचे मामा म्हणजेच प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांनी ठरवले होते. मुलगा झाला तर पंकज आणि मुलगी झाली तर पंकजा. त्याचे कारणही विशेष असेच होते, भारतीय जनता पक्षाला कमळ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते.

बीड मध्ये वरद ग्रुपच्या वतीने लोकनेते गोपीनाथराव मुंडे नगर उभे केले आहे. याचा लोकार्पण सोहळा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. बीडमध्ये नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाचे श्रेय देखील पंकजा मुंडे यांना दिले जात आहे. जसे गोपीनाथ मुंडे यांच्यावर बीडच्या जनतेने प्रेम केले तसेच प्रेम पंकजा मुंडे यांना देखील मिळेल का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!