Share

“काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जाने.रोजी ९६ वी जयंती होती. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तद्पश्चात भाजप नेत्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. याच मुद्द्यावर आज(३० जाने.)आज पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या सामना रोखठोकच्या माध्यमातून भाष्य केले आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर भाजप नेत्यांनी खालच्या पातळीवर जाऊन विधाने केली होती. उद्धव ठाकरे कोठे आहेत? अशी शंका चंद्रकांत पाटील वगैरे नेत्यांनी उपस्थित केली. विरोधकांच्या सर्व ‘लघुशंका’ २३ जानेवारी रोजी त्यांच्यावरच उलटल्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी उद्धव ठाकरे लोकांसमोर आले व त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.’

पुढे ते म्हणाले की,‘२६ जाने.च्या प्रजासत्ताक दिनी ते शिवतीर्थावर अवतरले व ध्वजारोहण केले. उद्धव ठाकरे यांनी २३ जानेवारीस केलेल्या भाषणाचे पडसाद जोरदार उमटत आहेत. भारतीय जनता पक्षाबाबत ठाम भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या भाषणातून एक संदेश नक्की मिळाला तो म्हणजे, काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य आहे व भारतीय जनता पक्षाशी ‘टेबलाखालून’ व्यवहार आणि बोलणी चालली आहेत, हे दोन पक्ष पुन्हा एकत्र येतील या गप्पांना पूर्णविराम मिळाला आहे.’

दरम्यान, २३ जानेवारीच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. भाजपच्या ढोंगाचे, नकली हिंदुत्वाचे इतके वाभाडे ठाकरे यांनी कधीच काढले नव्हते. भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीत शिवसेनेची वाढ झाली नाही. युतीत आम्ही सडलो, असे विधान त्यांनी पुन्हा केले. यावरून दोन पक्षांत आता टोकाचे भांडण सुरू झाले. महाराष्ट्रात कोण कोणाच्या आधाराने आणि मदतीने वाढले याचे संदर्भ देण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात जोर होता व त्यांच्या भाषणाने भाजपास मिरच्या झोंबल्या हे त्यामुळे नक्की झाले. विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीसांपासून आशिष शेलार यांच्यापर्यंत सगळे नेते शिवसेनेवर तुटून पडले. हा इतका जळफळाट कशासाठी?, असा सवालही राऊतांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!