मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची २३ जाने.रोजी ९६ वी जयंती होती. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राज्यभरातील शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तद्पश्चात भाजप नेत्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. याच मुद्द्यावर आज(३० जाने.)आज पुन्हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्या सामना रोखठोकच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘२३ जानेवारीच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. भाजपच्या ढोंगाचे, नकली हिंदुत्वाचे इतके वाभाडे ठाकरे यांनी कधीच काढले नव्हते. भारतीय जनता पक्षाबरोबरच्या युतीत शिवसेनेची वाढ झाली नाही. युतीत आम्ही सडलो, असे विधान त्यांनी पुन्हा केले. यावरून दोन पक्षांत आता टोकाचे भांडण सुरू झाले. महाराष्ट्रात कोण कोणाच्या आधाराने आणि मदतीने वाढले याचे संदर्भ देण्यात येत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणात जोर होता व त्यांच्या भाषणाने भाजपास मिरच्या झोंबल्या हे त्यामुळे नक्की झाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांपासून आशिष शेलार यांच्यापर्यंत सगळे नेते शिवसेनेवर तुटून पडले. हा इतका जळफळाट कशासाठी?’, असा सवालही राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘उद्धव ठाकरे यांच्या जोरदार भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. फडणवीस यांनीही जोरदार मुद्दे मांडले. शेवटी कोण श्रेष्ठ? कोण कोणाचा बाप? हाच लढाईचा बिंदू ठरत आहे. भारतीय जनता पक्षाच्या मदतीशिवाय शिवसेनेची वाढ शक्यच नसल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केले. ही अतिशयोक्तीच म्हणायला हवी.’
महत्वाच्या बातम्या:
“काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेची महाआघाडी हेच यापुढे महाराष्ट्राचे राजकीय भविष्य”
पुणे सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ७२ तासांत विनयभंग करणाऱ्या आरोपीला सुनावली शिक्षा
‘महाराष्ट्राला ‘बेवडाराष्ट्र’ बनवण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न’; किरीट सोमय्या यांची टीका
भाजप आणि माझं नातं वयाच्या नवव्या महिन्यापासून – पंकजा मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

