Share

‘महाराष्ट्राला ‘बेवडाराष्ट्र’ बनवण्याचे महाविकास आघाडीचे प्रयत्न’; किरीट सोमय्या यांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे नेहमीच महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर आरोप करत असतात. तसेच त्यांनी आता राज्य सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयावरून देखील महाविकास आघाडी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) तसेच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, संजय राऊत बेवाड्यासारखे वागतात, नवाब मालिकांना प्रश्न विचारले असता ते म्हणतात किरीट सोमय्या आयटम गर्ल आहे, असं सोमय्या म्हणाले. किरीट सोमय्या यांचा नगरविकास खात्यातील व्हायरल फोटो बाबत बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सोमय्या म्हणाले, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) माझ्या शेजारी येऊन बसले. मी चाळत असलेल्या फाइल मध्ये डोकावून पाहत होते आणि त्यावेळी त्यांच्या एका सहाय्यकाने आमचा एकत्र फोटो काढून तो व्हायरल केला, असं सोमय्या यांनी सांगितलं.

तसेच राज्यसरकारने घेतलेल्या वाईन विक्रीवरुन (Wine Sale) देखील किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. जनरल स्टोअरमध्ये तसेच सुपर मार्केटमध्ये (Super Market) वाईन विकता येणार असल्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. या निर्णयावरून भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. किरीट सोमय्या म्हणाले, महाराष्ट्राला बेवडाराष्ट्र बनवण्याचे महाविकास आघाडी सरकारचे प्रयत्न आहेत, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!