Share

नाफेडच्या वतीने जालन्यात हरभरा खरेदीसाठी नोंदणीला सुरुवात

Published On: 

जालना :  चालु हंगामातील आधारभूत किंमत खरेदी योजनेतून नाफेडच्या वतीने शेतकऱ्यांना खरेदीसाठी नोंदणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने नोंदणी तसेच खरेदीसाठी अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली नाही.

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील पांगरी येथे वेदशक्ती फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या वतीने नाेंदणी करण्यात आली आहे. तर याचा परिसरातील शेतकऱ्यांनी नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर २०२० – २१ या हंगामाकरिता नोंदणी करताना शेतकऱ्यांनी सुरु वर्षाचा ऑनलाईन ७ / १२ चा उतारा, आधारकार्ड, बँक खाते पासबुक स्कॅन करुन पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहे. तर शेतकऱ्यांना नोंदणीबाबत काही अडचणी आल्या असतील तर फार्मर कंपनीशी सपर्क करण्याचे आवाहन देखील या वेळी करण्यात आले आहे.

परिसरातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, जेणेकरुन लॉकडाऊन तसेच कोरोनाचा वाढती संख्या बघता शेतकऱ्यांच्या हातात पैसा येणे गरजेचा आहे. तर केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या आधारभूत किंमत देखील ठरवण्यात आली आहे. तसेच या वेळी हरभऱ्याची प्रतवारी देखील ठरवण्यात आली आहे. तसेच या वेळी ऑनलाइन नोंदणी करणे ही खरेदी करण्यासाठी अनिवार्य करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!