Share

कोकणात नाही तर विदर्भात होणार रिफायनरी ? काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्र्यांना करून दिली ‘ती’ आठवण

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : कोरोना काळानंतर महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर ‘रत्नागिरी राजापूर रिफायनरी(नाणार)’ सारखा प्रकल्प हातातून गमावणं कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखं नाही, अशी भूमिका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. ‘राज्याचं दीर्घकालीन हित लक्षात घेऊन ह्या प्रकल्पाच्या बाबतीत सरकारने सामंज्यस्याची भूमिका घ्यावी,’ अशी मागणी राज ठाकरे यांनी या पत्राद्वारे केली आहे. राज ठाकरेंनी कोकणातील या रिफायनरीला समर्थन दिल्यामुळे भाजप नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे.

मात्र, आता ही रिफायनरी विदर्भात केली जावी अशी मागणी करत काँग्रेस नेत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांच्या शब्दाची आठवण करून दिली आहे. यासंदर्भात काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.

”3 लाख कोटीच्या या प्रकल्पातून विदर्भातील 40 ते 45 हजार युवकांना प्रत्यक्ष रोजगार व 1 लाख युवकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. केंद्र व राज्य शासनस्तरावर पुढाकार घेऊन आपण विदर्भात हा प्रकल्प आणावा व रोजगार निर्मिती करावी तसेच वैदर्भीय युवकांचे भविष्य उज्ज्वल करावे, अशी विनंती मी आपणास या पत्राद्वारे पुन्हा एकदा करत आहे आणि म्हणूनच हे स्मरणपत्र आपल्याला पाठवत आहे,’ असं आशिष देशमुख म्हणाले आहेत.

तर, ‘रत्नागिरीच्या नाणार येथील 3 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प विदर्भात हलवा, अशा मागणीचे निवेदन मी आपण मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी (दि. 29 नोव्हेंबर 2019 ला) भेटून आपल्याला दिले होते. त्याआधी अशा आशयाचे एक निवेदन मी आधी आपल्याला 8 मार्च 2018 ला दिले होते. त्यानंतर 23 एप्रिल 2018 ला आपण माझ्या मागणीनुसार हा प्रकल्प विदर्भात हलविण्यास सहमती दर्शविली होती. आपल्या व्यक्तिगत भेटीत आणि जाहीर सभेतसुद्धा आपण हा प्रकल्प विदर्भात नक्कीच स्थलांतरित करू, असे आश्वासन वारंवार दिले होते, हे विशेष.’

‘रत्नागिरीच्या नाणार येथे प्रस्तावित रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाला शिवसेनेचा व स्थानिक लोकांचा विरोध आहे. हा प्रकल्प विदर्भात आल्यास उद्योगधंद्यांना एक नवी गती मिळेल तसेच रोजगार निर्मितीला चालना मिळेल. विदर्भातील मागास जिल्ह्यांमध्ये नवे उद्योगधंदे येण्यास व विदर्भाचा विकास होण्यास पूरक वातावरण निर्माण होईल तसेच कृषी आधारित प्रकल्पांना नव्या संधी उपलब्ध होऊन जे शेतकरी आर्थिक विवंचनेमुळे जीवन संपवतात ते देखील थांबण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळेल. लगतच्या 5 राज्यांना या प्रकल्पामुळे फायदा होईल,’ असं सविस्तर भाष्य करत आशिष देशमुख यांनी हा रखडलेला प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्याआधीच विदर्भात हलवावा अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!