Share

शिवसेना स्वबळावर लढवणार गोव्यात २५ जागा : संजय राऊत

Published On: 

पणजी : पुढील वर्षी मार्च महिन्यात गोवा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गोवा विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना गोव्यामध्ये २० ते २५ जागांवर लढणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे गोव्यात भाजपची कोंडी होणार असल्याचं दिसून येत आहे.

शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीतही उमेदवार उतरवले होते. मात्र बिहारमध्ये शिवसेनेच्या उमदेवारांचं डिपॉझिट जप्त झाले होते. त्यानंतर शिवसेनेने पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्यानंतर आता शिवसेनेने गोवा विधानसभा निवडणुकीकडे मोर्चा वळवला आहे.

या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत गोवा दौऱ्यावर असून त्यांनी काल आणि आज पक्षाच्या वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूक रणनीतीवर चर्चा केली. पणजी येथील शिवसेना मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी गोव्यातील राजकीय परिस्थितीवर परखड मत व्यक्त करतानाच शिवसेना यावेळी स्वबळावर विधानसभा निवडणुका लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती दिली.

राऊत म्हणाले, ‘गेल्या वेळी आणि मगो आणि गोवा सुरक्षा मंच सोबत युती करून निवडणुका लढवल्या होत्या. युती मध्ये फक्त ३ जागा आम्हाला मिळाल्या होत्या. युती झाली की मर्यादा येतात.त्यामुळे पक्ष विस्तार अपेक्षित वेगाने होत नसल्याने यावेळी आम्ही स्वबळावर २५ जागा लढवण्याचे ठरवले आहे. १० ते १५ ठिकाणी आमचे उमेदवार ठरले असून इतर ठिकाण बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.’ असे मत यावेळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!