Share

“ईडीच्या नावाखाली मुंबईतल्या प्रतिष्ठित ७० बिल्डर्सकडून कोट्यावधींची वसुली सुरु”, संजय राऊतांचा खुलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज (१५ फेब्रुवारी) मुंबई येथील शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद झाली. प्रचंड गर्दी, शिवसैनिकांचा उत्साह आणि मोठ्या घोषणांसह या पत्रकार परिषदेची सुरुवात झाली. शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार यावेळी उपस्थित होते. सर्वांनाच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) काय बोलणार यांची उत्सुकता होती. यावेळी त्यांनी ईडीच्या नावाखाली मुंबईतल्या प्रतिष्ठित ७० बिल्डर्सकडून कोट्यावधींची वसुली (Recovery of crores from 70 reputed builders in Mumbai) सुरु असल्याचा मोठा दावा केला आहे.

गेल्या चार महिन्यांपासून मुंबईच्या मोठमोठ्या बिल्डर्सकडून ईडीच्या नावाने वसुली सुरु आहे. मुंबईचे 70 प्रतिष्ठित बिल्डरकडून ईडीच्या नावाने जी वसूली होत आहे त्याबद्दल ईडी अधिकाऱ्यांनादेखील माहिती आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केली आहे. मी नंगा माणूस आहे. मी शिवसैनिक आहे. तुम्ही कितीही आरोप करा. मी लढणार आहे. मी ईडीवाल्यांना विचारतो. हा जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे? हे नाव ऐकून मुंबई आणि दिल्लीच्या ईडी कार्यालयात दम घुटणार. त्यांना घाम फुटेल. चार महिन्यांपासून मुंबईच्या मोठमोठ्या बिल्डर्सकडून ईडीच्या नावाने वसुली सुरु आहे. मुंबईचे ७० प्रतिष्ठित बिल्डरकडून ईडीच्या नावाने जी वसूली होत आहे त्याबद्दल ईडी अधिकाऱ्यांनादेखील माहिती आहे. ईडीच्या काही अधिकाऱ्यांना हमखास ठाऊक आहे. ते कोण आहेत आणि कुणाचे माणसं आहेत त्याबाबतची सगळी माहिती माझ्याजवळ असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी जितेंद्र नवलानी, फरीत शमा, रोमी आणि फिरोज शमा हे चार कुणाचे एजंट आहेत? मुंबईच्या सहा बिल्डर्सकडून त्यांनी जवळपास ३०० कोटी वसूल केले आहेत. त्यांची मनलॉन्ड्रिंग कुठे केली त्याबाबत मी तुम्हाला माहिती देतो. त्यामध्ये ईडीचे किती अधिकारी सहभागी आहेत, ते कुठे बसतात, कुठे अय्याशी करतात ते सगळं मी देशाला सांगेन. तुम्ही वाटल्यास मला गोळी झाडा, जेलमध्ये टाका. मी आपल्याला घाबरणार नाही. असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!