Share

PMC बँक घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करा – संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज (१५ फेब्रुवारी) मुंबई येथील शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद सुरु आहे. प्रचंड गर्दी, शिवसैनिकांचा उत्साह आणि मोठ्या घोषणांसह या पत्रकार परिषदेची सुरुवात झाली. शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार यावेळी उपस्थित आहेत. सर्वांनाच शिवसेना खासदार संजय राऊत काय बोलणार याची उत्सुकता होती. यावेळी त्यांनी थेट किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya)यांच्यावर निशाणा साधला आहे.

ईडी आणि सीबीआय, ईओडब्लू, पंतप्रधान, गृहमंत्री मला ऐकत आहेत. असे म्हणत त्यांनी  मला सांगा निकॉन इन्फ्रा कंपनी (Nikon Infra Company) किसकी है?असा सवाल करत  किरीट सोमय्या राकेश वाधवानचे भागिदार असल्याचे म्हटले आहे. तसेच  किरीट समोय्यांनी हजारो कोटींचा प्रकल्प उभारला असून  पीएमसी बँक घोटाळ्यात सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कॅश आणि जमीन दुसऱ्याच्या नावावर घेतली. वसईत लाडानीच्या नावावर ही चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटीला घेतली. असा आरोप करत त्यांनी ही निकॉन इन्फ्रा कंपनी नील किरीट सोमय्या यांची असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला.

तसेच या कंपनीचे कोणतेही पर्यावरणसंबंधी कागदपत्रे नसल्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कंपनीसबंधी लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी मराठी माणसाचा द्वेष, महाराष्ट्राविषयी असुया.. हाच किरीट सोमय्या यानं काही वर्षांपूर्वी एक याचिका दाखल केली होती. मुंबईत मराठी भाषा शाळेत सक्तीची नको, असं म्हणाला होता. तो आज भाजपचा फ्रंटमॅन झाला आहे. हे लोक मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची भाषा करत आहे. मराठी भाषेच्या विरुद्ध हा भडवा कोर्टात गेला. याचं थोबाड आधी बंद करा नाहीतर आम्ही करू, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!