पुणे: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी शिवसेनेचे सर्व मंत्री,आमदार, खासदार या पत्रकार परिषदेसाठी शिवसेना भवनात उपस्थित होते. विशेष म्हणजे संजय राऊत पत्रकार परिषदेसाठी दाखल होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा उत्साह बघायला मिळाला. तसेच ते येथे दाखल होताच त्यांच्या हातात खूप मोठ्या फाईल्स दिसून आल्या. यावेळी बोलत असतांना संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. त्याच सोबत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर देखील खरमरीत टीका केली आहे. पत्रकार परिषदेची सुरुवात त्यांनी मला वाटतंय ही आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद आहे, असे म्हणत केली. तसेच अनेक नेत्यांचे सकाळपासून फोन आल्याचेही त्यांनी सांगितले.
https://twitter.com/mohol_murlidhar/status/1493549594071896064?s=20&t=oImPXvJOwd2JO4CLb2HfHA
संजय राऊत यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेनंतर विरोधकांकडून टीका होताना दिसत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी देखील ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, खदखद परिषदेत स्वतःचाच ‘घाम’ निघाला! इतकी भरकटलेली पत्रकार परिषद कधी पाहण्यात आली नव्हती. तोंडाच्या वाफा, हवेत गोळीबार!, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
PMC बँक घोटाळा प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना अटक करा – संजय राऊत
महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर; संजय राऊतांचा आरोप
‘पंतप्रधान दिल्लीत माझं भाषण ऐकत आहेत’ ; संजय राऊत यांचे वक्तव्य
“किरीट सोमय्या मुलुंडचा दलाल, धमक्या देतो”; संजय राऊत आक्रमक!
“…तर मी राजकारण सोडेल, नाहीतर ‘त्या’ दलालाला शिवसेना जोड्याने मारेल”, संजय राऊतांचा इशारा


