Share

“मोहित कंबोज भाजपचा फ्रंटमॅन, फडणवीसांना बुडवणार”, संजय राऊतांचा मोठा दावा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज (१५ फेब्रुवारी) मुंबई येथील शिवसेना भवनात शिवसेनेची पत्रकार परिषद झाली. प्रचंड गर्दी, शिवसैनिकांचा उत्साह आणि मोठ्या घोषणांसह या पत्रकार परिषदेची सुरुवात झाली. शिवसेनेचे सर्व मंत्री, आमदार, खासदार यावेळी उपस्थित होते.सर्वांनाच शिवसेना खासदार संजय राऊत काय बोलणार यांची उत्सुकता होती. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा अजून एक फ्रंटमॅन आहे,(Mohit Kamboj BJP frontman) ज्याचे नाव मोहित कंबोज आहे. फडणवीस साहेबांना तो डूबवणार आहे. पत्राचाळ प्रश्न निर्माण करणाऱ्या मोहित कंबोजनेच पत्राचाळची जमीन खरेदी केली आहे. सर्वांत मोठा घोटाळा हा झाला आहे. आणि यामध्येही पीएमसी बँकेचा पैसा यामध्ये लागला आहे. मोहित कंबोज यांचे पत्राचाळ येथे लक्झर कंस्ट्रक्शन सुरु आहे. असा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

राकेश वाधवान यांच्याकडून मोहित कंबोज यांच्या केबीजी ग्रुपने १ लाख ५५ हजार (४० एकर क्षेत्र) जागा ज्याची किंमत आहे १२ हजार करोड ती मोहित कंबोज यांनी १०० कोटींत खरेदी केली आहे. कशी घेतली ही जमीन? कोणाचे पैसे आहेत? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. तसेच कंबोज बायोफार्मिंग प्रायवेट लिमिटेड, केबीजी व्हेंचर्स, आयर्नमॅन रियल इस्टेट, तीर्थ एक्सपिरीयन्स प्रायवेट लिमिटेड, केबीजी हॉटेल्स, सिल्वर फिल्म लिमिटेड यात पैसा कुठून आला, याबाबत फक्त फडणवीस यांनाच माहिती आहे. असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

दरम्यान गेल्या चार महिन्यांपासून मुंबईच्या मोठमोठ्या बिल्डर्सकडून ईडीच्या नावाने वसुली सुरु आहे. मुंबईचे 70 प्रतिष्ठित बिल्डरकडून ईडीच्या नावाने जी वसूली होत आहे त्याबद्दल ईडी अधिकाऱ्यांनादेखील माहिती आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केली आहे. मी नंगा माणूस आहे. मी शिवसैनिक आहे. तुम्ही कितीही आरोप करा. मी लढणार आहे. मी ईडीवाल्यांना विचारतो. हा जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे? हे नाव ऐकून मुंबई आणि दिल्लीच्या ईडी कार्यालयात दम घुटणार. त्यांना घाम फुटेल. चार महिन्यांपासून मुंबईच्या मोठमोठ्या बिल्डर्सकडून ईडीच्या नावाने वसुली सुरु आहे. मुंबईचे 70 प्रतिष्ठित बिल्डरकडून ईडीच्या नावाने जी वसूली होत आहे त्याबद्दल ईडी अधिकाऱ्यांनादेखील माहिती आहे. ईडीच्या काही अधिकाऱ्यांना हमखास ठाऊक आहे. ते कोण आहेत आणि कुणाचे माणसं आहेत त्याबाबतची सगळी माहिती माझ्याजवळ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!