औरंगाबाद :घाटीत मंगळवारी (दि.२७) २७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत घाटीत मृत्यू होण्याचा आकडा हा १९६७ वर गेला आहे.
घाटीत आणखी २७ रुग्णांचा मृत्यू झाला त्यात जाधववाडी हडको येथील ५५ वर्षीय स्त्री, मिल कॉर्नर येथील ७० वर्षीय पुरुष, सिल्लोड टिळकनगर ६५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ४० वर्षीय पुरुष, चिस्तीया कॉलनी एन-६ सिडको २५ वर्षीय स्त्री, सिल्लोड येथील ७४ वर्षीय स्त्री, गेवराई येथील ६५ वर्षीय पुरुष, मिल कॉर्नर ५५ वर्षीय स्त्री, समतानगर येथील ६० वर्षीय स्त्री, सिल्लोड येथील २८ वर्षीय पुरुष, पिंपरी औरंगाबाद येथील सिडको एन-८ येथील ६३ वर्षीय स्त्री, वैजापूर येथील ६३ वर्षीय स्त्री, औरंगाबाद, भोकरदन गोसेगाव येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला. तर परभणी, पाथरी येथील ६० वर्षीय स्त्री, नांदेड येथील ४५ वर्षीय पुरुष, नेवासा अहमदनगर येथील ७१ वर्षीय पुरुष, अहमदनगर पाथर्डी ७० वर्षीय पुरुष, बीड येथील ६ वर्षीय स्त्री, नेवासा अहमदनगर येथील ७२ वर्षीय स्त्री, जालना, घनसावंगी येथील ६५ वर्षीय पुरुष, सिंदखेडराजा ६० वर्षीय स्त्री, जालना भोकरदन येथील ६२ वर्षीय पुरुष, राहुरी अहमदनगर येथील ५५ वर्षीय स्त्री, जालना, अंबड येथील ५० वर्षीय पुरुष, श्रीरामपूर अहमदनगर ६४ वर्षीय पुरुष, नेवासा येथील ६९ वर्षीय स्त्री रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागासह औरंगाबाद शहरात थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोविडचा विषाणू हा अधिक घातक ठरत आहे. पहिल्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्यूचे प्रमाणही अधिक दिसून येत आहे. आजवर कोरोनामुळे वयोवृद्ध नागरिकांचाच मृत्यू होत होता. मात्र दुस-या लाटेत बालकांसह युवकांचाही मृत्यू होत असल्याचे समारे येत आहे. शहरात मागील चार दिवसांत १० ते २१, तसेच तिसच्या आतील वयोगटातील मृत्यू होत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- Breaking : सोनिया गांधींचा थोरातांना फोन; महाराष्ट्रातील स्थितीबाबत केली महत्वाची चर्चा
- बीड येथील धक्कादायक प्रकार; रेमेडेसिवीरच्या गैरव्यवहाराबाबत चौकशी का केली नाही म्हणत थेट आत्महत्येचा प्रयत्न
- चांगली बातमी! परभणीत एका आठवड्यात साडेपाच हजार रुग्णांची कोरोनावर मात
- दुसऱ्या लाटेने मोठा धडा शिकवलाय, आता तिसऱ्या लाटेआधी…; राजेश टोपेंच सूचक विधान
- संकटाच्या वेळी ‘मूकदर्शक’ राहू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला पुन्हा मागितला आराखडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

