Share

ऑनलाईन‘ परीक्षेपुर्वी ‘मॉकटेस्ट‘ द्यावी लागणार, बुधवारपासून चार दिवस मॉक टेस्ट

Published On: 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमाचे सर्वच पेपर आता ऑनलाईन होणार आहेत. या पार्श्वभुमीवर २८ एप्रिल ते २ मे दरम्यान विद्यार्थ्यांसाठी ‘मॉक टेस्ट‘चे आयोजन करण्यात आले असल्याचे परिक्षा विभागाकडून सांगण्यात आले आहे.

पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा १६ मार्च व ६ एप्रिल पासून सुरु करण्यात आल्या आहेत. दरम्यान १५ एप्रिल ते २ मे या दरम्यान शासनाने निर्बंध घातल्याने सर्व पेपर स्थगित करण्यात आले आहेत. यानंतर गेल्या आठवडयात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक घेतली. आता येथून पुढील सर्व पेपर हे ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी कोरोना ची सर्व नियमावली पाळून परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच सर्वच विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयात  ‘आयटी‘ कॉऑर्डिनेटर्मची संख्या दुप्पटीने वाढवली आहे. पदवीचे उर्वरित पेपर ३ मेपासून तर पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मे पासून ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी २८ एप्रिल ते २ मे दरम्यान ‘ऑनलाईन मॉक टेस्ट‘ द्यावी लागणार आहे. या मॉक टेस्ट बाबत काही अडचण आल्यास आपल्या महाविद्यालयाच्या ‘आयटीच्या समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन या विद्यापीठाच्या परिक्षा तसेच मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या     

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!