Share

“सरकारच्या हाताला नव्हे तर…”; शरद पवारांच्या वक्तव्याची आठवण करुन देत चंद्रकांत पाटलांची टीका

Published On: 

🕒 1 min read

सांगली : सरकारच्या हाताला नव्हे तर बुद्धीला लकवा मारला आहे, अशी टीका भाजप प्रदेध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये ताळमेळ नाही, असे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या जून्या वक्तव्याची आठवण करुन देत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, “आधीचं जे सरकार (२००९ ते २०१४) या सरकारला शेवटी शेवटी शरद पवारांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा आला. त्यामुळे ते सही करत नाहीत. मात्र आता या सरकारच्या हातालाच नाही, तर मेंदूलाही लकवा मारला आहे. या सरकारची बुद्धीच चालत नाही. कोणतेही निर्णय या सरकारकडून घेतले जात नाहीत. साधं उदाहरण आहे, पाच आयएएस घालवले तुम्ही. त्यांना आयुष्यात किती काम करता आलं असतं. एसटी कर्मचाऱ्यांचा संप कशाला लांबवायला हवा. सरकारी कर्मचाऱ्यांचे जेवढे फायदे आहेत, ते देता आले असते.”
 
यापूर्वी देखील चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. “भारतातल्या कुठल्याही राज्य सरकारने जे आजवर कधीही केले नाही, ते मविआ सरकारने करून दाखवले आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, विद्यार्थ्यांचे भविष्य, शेतकऱ्यांचा पीकविमा, पूरग्रस्तांना नुकसान भरपाई अशा प्रत्येक विषयात महाविकास आघाडी सरकार घालत असलेल्या गोंधळावर पीएचडी करता येईल’, असे म्हणत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला होता.
महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!