Share

मोदीजींची ही ‘त्रिसूत्री’ कोरोनाविरोधी लढा नक्कीच बळकट करेल- चंद्रकांत पाटील

Published On: 

🕒 1 min read

नवी-दिल्ली : काल(२६ डिसें.)रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी लसीकरणासंदर्भात तीन महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास ३ जानेवारी २०२२ पासून सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस १० जानेवारीपासून सुरु होणार असून ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना सुद्धा बूस्टर डोसचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना बूस्टर डोस दिल्या जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा त्यांची दूरदृष्टी आणि सत्वर निर्णय घेण्याच्या क्षमतेचा प्रत्यय दिला आहे. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेत किशोरवयीन मुला-मुलींचे लसीकरण, आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठांसाठी आणखी एक लस ही मोदीजींची त्रिसूत्री कोरोनाविरोधी लढा नक्कीच बळकट करेल’, असे पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, ओमायक्रॉन संदर्भात बोलत असतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की,’अनेक देशांमध्ये कोरोनाचा नवीन व्हेरियंट अर्थातच ओमायक्रॉनचे संकट आले आहे. तसेच ओमायक्रॉनचा भारत देखील याचा संसर्ग वाढत असल्याने चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु घाबरून न जाता सतर्क राहत नियमांचे पालन करण्याची गरज आहे. यासाठी नियमित मास्क वापरणे गरजेचे आहे.’ तसेच भारताने आत्तापर्यंत १४ कोटी डोस दिले असून देशात लवकरच नाकाद्वारे देणारी लस आणि डीएनए लस देण्यात येणार आहे,’ असेही नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!