Share

Sanjay Raut : बंडखोर आमदारांना जेवणातून अफू आणि गांजा देत आहेत ; संजय राऊतांचा आरोप

Published On: 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील आपसी भांडण वाढत चालले आहे. एकीकडे बंडखोर एकनाथ शिंदे महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी दोनतृतीयांशपेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा करत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे संघटना मजबूत करण्याबरोबरच सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेवर कोणाचा अधिकार असावा यावरूनही चांगलाच वाद सुरु आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत बोलताना बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री पद सोडले असते तर सत्ता शिवसेनेसोबत राहीली असती आणि शिवसेना सुद्धा वाचली असती? , असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर राऊत म्हणाले, “एकनाथ शिंदे येतात का? त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही उद्धजींना सांगू, हे येणार नाहीत. हे भाजपच्या अधीन गेले आहेत. त्यांना चहा आणि जेवणातून अफू आणि गांजा देत आहेत. त्या बधिरतेने ते सर्व बोलत आहेत.”

“तसेच तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे, हे महाराष्ट्रात येऊन सांगा. राज्यात येऊन सांगा की महाविकास आघाडीतून बाहेर पडा आमच्याकडे ४० आमदार आहेत. नक्कीच उद्धव ठाकरे त्यांचा कौल मान्य करतील”, असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला.

पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे-

संजय राऊत म्हणाले, “पक्ष सोडणाऱ्यांवर काय कारवाई होणार हे संध्याकाळपर्यंत कळेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व निवडणुका लढवू. शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांनी शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागू नयेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावावर मते मागावी. महाविकास आघाडी एक आहे. आम्ही ६ ठराव पारित केले असून शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारसरणीवर चालणार असून संयुक्त महाराष्ट्राच्या विचारधारेशी तडजोड करणार नाही, असा निर्धार केला आहे. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. बंडखोरांवर कारवाई करण्याचे अधिकार मुख्यमंत्री ठाकरे यांना आहेत.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!