मुंबई : शिवसेनेत (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) असे दोन गट निर्माण झाले आहे. शिंदे गटाकडे दोन तृतीयांश आमदार असल्याने महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार अल्पमतात आले असून कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानंतर या सर्व घडामोडींवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
गडकरी म्हणाले कि, मला वाटते की महाराष्ट्रावरील संकट लवकरच दूर होईल. आगे आगे देखो होता है क्या. आजच्या समस्येमध्येच उद्याचे उत्तर लपलेले असते. लवकरच याबाबत सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. लवकरच परिस्थिती स्पष्ट होईल. अंधार निघून जाईल आणि सूर्य उगवेल. वैयक्तिक संबंध हे राजकाराणापेक्षा वेगळे असतात. ते सरकारमध्ये असोत किंवा नसोत संबंध तेच राहतात. राजकारण वेगळे असते, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, आज दिवसभरातील मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. आज बंडखोर आमदार आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांचे पुतळे जाळून शिवसैनिक त्यांचा निषेध करत आहेत. यानंतर आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीत पाच ठराव मंजूर करण्यात आले आहेत. यानंतर दुसरीकडे शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाणे येथील त्यांच्या लुईसवाडी निवासस्थानाबाहेर श्रीकांत शिंदे यांच्यासह समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :


