Share

Mangesh Chiwte : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली वारकरी बांधवांसाठी आरोग्य तपासणी व औषधे वाटप सुरु – मंगेश चिवटे

Published On: 

मुंबई : विधान परिषद निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अनेक शिवसेना नेत्यांनी सेनेशी बंड पुकारत आसामला मुक्काम ठोकला आहे. माझ्यासोबत ४० आमदार आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहेत, सोबत नवीन गट स्थापन करणार अशी चर्चा सुरु असताना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला सामोरे जात एकनाथ शिंदे यांनी गट स्थापन केला आहे. दरम्यान  एकनाथ शिंदे आणि डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी बांधवांसाठी आरोग्य तपासणी आणि औषधे वाटप शिबीर सुरु आहे. यांसदर्भात शिवसेना कार्यकर्ते मंगेश नरसिंह चिवटे यांनी महत्वाचे विधान केले आहे.

शिवसेना कार्यकर्ते मंगेश नरसिंह चिवटे म्हणाले, “वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षची राज्यभरातील कार्यालये ही रुग्णसेवेची मंदीर आहेत. यावर हल्ला होणं दुर्दैवी आणि निंदनीय आहे. तरीही , माझ्या सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे कि, संयम बाळगा. विचलित होऊ नका आताही दोन्ही पालखी मार्गावर मा. श्री एकनाथ शिंदे आणि मा. खा डॉ श्रीकांत दादा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी बांधवांसाठी आरोग्य तपासणी आणि औषधे वाटप शिबीर सुरु आहे. यात खंड पडू देऊ नका. रुग्ण सेवा हीच ईश्वरसेवा”.

शिवसेनेचे पाच ठराव-

आज (२५ जून) शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी बंडखोरांना त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा, मी मध्ये पडणार नाही. असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. या बैठकीत पाच ठराव मंजूर झाले आहेत. त्यापैकी पहिला ठराव म्हणजे सर्व अधिकार हे पक्ष प्रमुखांकडे असतील. म्हणजेच उद्धव ठाकरेंकडे असतील. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची होती, आहे आणि राहणार त्यामुळे बंडखोर आमदारांनी त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा. तिसरा ठराव म्हणजे शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे पक्षप्रमुखांना अधिकार असतील. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव अन्य कुणाला वापरता येणार नाही. सेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील. असे पाच ठराव या बैठकीत मंजूर झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!