मुंबई : सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. या अभिनेत्याने मराठी चित्रपटांबरोबर आता हिंदी चित्रपटांमध्ये देखील चांगली ओळख निर्माण केली आहे. सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. सिद्धार्थच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. नुकतंच त्याने तिच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.
सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. नुकतीच त्याने त्याच्या इंस्टाग्रामवरून त्याच्या मुलीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शन मध्ये लिहिले की, “25 जून, माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस… स्वराचा वाढदिवस.. तुझ्या सगळ्या ईच्छा, स्वप्न पूर्ण होवोत..आणि बाबा आहेच ती पूर्ण करायला..अजून खूप मज्जा करत राहू..lv u forever swara…,”. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
https://www.instagram.com/p/CfNvgDXD1W7/
सिद्धार्थ जाधव कामामध्ये खूप व्यस्त असतो. पण तो त्याच्या कुटुंबासाठी कायम वेळ काढत असतो. सिद्धार्थला दोन मुली आहेत. सध्या सिद्धार्थ जाधवची पोस्ट खूप व्हायरल होत आहेत. चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


