🕒 1 min read
मुंबई : काल एकनाथ शिंदे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकार विरोधात दोन याचिका दाखल केल्या आहेत. शिंदे गटाने केलेल्या पहिल्या याचिकेत बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेच्या कारवाईला आव्हान दिले आहे. यानंतर दुसऱ्या याचिकेत विधानसभेत शिंदे यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही आमदाराला शिवसेना गटनेते पदी नियुक्ती किंवा प्रतोद बनविण्यावर आव्हान दिले आहे. बंडखोर 38 आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा केला आहे. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर पुन्हा हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर पुन्हा हल्लाबोल केला आहे. ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला, सर्व काही दिलं ते लोक जर एखाद्या दुसऱ्या पक्षात जात असतील तर महाराष्ट्राची माती ही गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना माफ करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची फोनवरुन चर्चा झाल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे.
याबाबत बोलताना राऊत म्हणाले कि, त्यांना मनसे मध्ये जायचं असेल तर त्यांनी खुशाल जावं. अशा गोष्टींमुळे मनसेला मुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर ही ऐतिहासिक गोष्ट म्हणावी लागेल. फक्त मनसेच नाही, तर एमआयएममध्येही ते जाऊ शकतात, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे. रोड टेस्ट आणि फ्लोअर टेस्टमध्ये आम्हीच विजयी होणार, असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
