मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आता वेगळे वळण आले आहे. शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंच्या गटाने न्यायालयामध्ये धाव घेतली असून आमदारांच्या निलंबनाची मागणी आणि गटनेता बदलण्याला विरोध दर्शवला आहे. आता यावर अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट खूप चर्चेत आहे.
अभिनेते किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. ते कायम राज्यातील राजकारणावर त्यांचे मत मांडत असतात. आपल्या वक्तव्यांमुळे किरण माने यांना ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. आता देखील त्यांनी एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेनंतर आपलं मत व्यक्त केलं आहे. सध्या त्यांची पोस्ट खूप चर्चेचा विषय बनली आहे. नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

किरण मानेंची पोस्ट –
“काय स्पीड हाय राव…आपण उगीच कोर्टाच्या वेळखाऊ कामकाजाला शिव्या देतो. आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेचा चमत्कार बघा. आज संध्याकाळी ६.३०ला एकनाथ शिंदेंची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली. रविवार असून संध्याकाळी ७.३० वाजता रजिस्ट्रीनं याचिका स्वीकारली आणि उद्या २७ला सुनावणी ठरवलीसुद्धा…निकालच लावून टाकायचा ना थेट…जय सुप्रीम कोर्ट.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

