मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांशी शिवसेना नेत्यांचा संपर्क झाला आहे, असा दावा काही शिवसेना नेत्यांनी केला असून असे एकूण 20 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत. यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सांताक्रुझमध्ये युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना बंडखोर आमदारांना चांगलेच सुनावले. “बरं झाली घाण गेली”, अशा शब्दांत त्यांनी बंडखोरांना टोला लगावला. यावरूनच माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी टीका केली आहे.
“पर्यावरण मंत्री म्हणून माझं हेच काम होते राज्यात कोठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेली आहे याचा आनंद आहे असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलेय. पण तुम्ही घरातल्या सोन्यासारख्या माणसांना गमावणे ह्याला घाण स्वच्छ करणे म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव येते..विनाशकाले विपरीत बुद्धी!”, असे ट्वीट सदाभाऊ खोत यांनी केले आहे.
पर्यावरण मंत्री म्हणून माझं हेच काम होते राज्यात कोठेही घाण साचू नये आणि ती घाण गेलेली आहे याचा आनंद आहे – आदित्य ठाकरे
तुम्ही घरातल्या सोन्यासारख्या माणसांना गमावणे ह्याला घाण स्वच्छ करणे म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव येते..
विनाशकाले विपरीत बुद्धी!
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) June 27, 2022
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी म्हटले कि, “बरं झाली घाण गेली. पर्यावरण मंत्री म्हणून महाराष्ट्रात घाण साचू देऊ नये हे माझं काम आहे. आता घाण साफ झाली आहे. ज्यांना मदत केली, ज्यांना उमेदवारी दिली त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे वाईट वाटते. बंडखोर आमदारांमध्ये जर हिंमत असती तर बंड करण्यासाठी सूरतला जाण्याची काय गरज होती?” असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
- Sambhaji Raje : “सत्तेत कुणीही या, पण लवकरात लवकर राज्यातील गोंधळ संपवा” ; संभाजीराजेंची प्रतिक्रिया
- Maharashtra Political Crisis : १९८० मध्ये झालेल्या सर्वात मोठ्या बंडाचे नेतृत्व करणारे बाळासाहेब पवारांच्या मुलाने सांगितला दोन बंडामधील फरक
- IRE vs IND : हार्दिक पंड्याचा विक्रम; भारताचा कप्तान म्हणून केली ‘अशी’ कामगिरी
- Clyde Crasto : शिंदेंचा ‘मनसे’शी संपर्क; क्लाईड क्रास्टो यांनी गुजराती म्हण ट्वीट करत लगावला टोला
- Subhash Sabane : “शिवसैनिकांनी भावनिक आवाहनाला न भुलता त्यांच्या लढ्याला समर्थन द्यावे” ; भाजपच्या सुभाष साबणे यांचं आवाहन


