औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, त्यासाठी आंदोलन करत असताना बळी द्यायचा नाही तर घ्यायचा आहे, याच भावनेतून साष्टपिंपळगाव मधील उपोषण मागे घेण्यात आलय. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आंदोलन स्थळी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैठकीत हा सूर निघाला.
जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव इथं सुरू असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मराठा समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांची बैठक शनिवारी काष्टपिंपळगाव इथं आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली. त्याला गावातील सर्वांनी एकमताने होकार दिल्याने उपोषण सोडण्यात आले.
उपोषण सोडण्यात आले असले तरी आंदोलन थांबलेले नाही. लवकरच राज्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात अशा प्रकारचे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आलाय. त्यामुळं उपोषण जरी सोडले असले तरी आंदोलन थांबवलेले नसल्याचे साष्टपिंपळगाव येथील माजी सरपंच शहादेव औटे यांनी महाराष्ट्र देशाशी बोलतांना सांगितल.
महत्वाच्या बातम्या
- पालिका-वक्फ बोर्डाचा वाद चिघळण्याची शक्यता
- कचर्याचे ढिगारे संपवण्यासाठी दोन्ही कचरा प्रकल्प १६ तास चालणार
- एस.टी.बसच्या धडकेत दिव्यांग प्रवासी जखमी
- केंद्र सरकार कृषी कायद्याच्या भूमिकेवर ठाम, मोदींचा पुनुरुच्चार
- मनपाच्या नागरी मित्र पथकाने केली ७६ लाखांवर वसुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

