नवी दिल्ली : मंगळवारी 23 मार्चला भारताचे शेजारील राष्ट्र पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन होता यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठवला होता. नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवरून भारत पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण असतात मात्र तरी देखील भारताकडून अनेकदा पाकिस्तानला मैत्रीचा हात दिला जातो तर मदत देखील केली जाते.
दरम्यान आता पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छांनंतर इम्रान सरकारमधील मंत्र्याची त्यावर प्रतिक्रिया आली असून इम्रान सरकारमध्ये मंत्री असलेल्या असद उमर यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदींच्या या पाऊलाचं स्वागत केलं आहे. असद उमर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं, की पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे पाठवण्यात आलेला 23 मार्चचा संदेश हे एक चांगलं पाऊल आहे. पंतप्रधान झाल्यापासूनच इम्रान खान शांतीच्या मार्गाला पाठिंबा देण्याचा आणि सर्व शेजाऱ्यांसोबत शांती कायम ठेवण्याचं आवाहन करत आहेत.
PM @narendramodi message of goodwill on 23rd march is a welcome step. From the day he became PM @ImranKhanPTI has been expressing his desire for a peaceful south asia with relationships with all our neighbour's based on mutual respect & peace coexistence.
— Asad Umar (@Asad_Umar) March 23, 2021
मागील काही दिवसांपासून पाकिस्ताननं भारताबद्दल अनेक वक्तव्य केली आहेत, ज्यातून ते भारतासोबत शांततेचा संकेत देत आहेत. नुकतंच पाकिस्तान सेनेचे प्रमुख कमर बाजवा यांनी म्हटलं, की पाकिस्तान भारतासोबत जुन्या गोष्टी विसरुन चांगलं नातं बनवू इच्छित आहे. पंतप्रधानांबद्दल बोलायचं झाल्यास इमरान खान यांना 20 मार्चला कोरोनाची लागण झाली तेव्हा मोदींनी ट्वीट करत ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही केली होती.
महत्वाच्या बातम्या
- विराटला अगोदरच आला होता अंदाज, प्रसिद्ध कृष्णा सरप्राईज पॅकेज ठरू शकतो
- ‘संघ निवडताना भेदभाव’ ; कोहलीवर भडकला वीरेंद्र सेहवाग
- ‘वाझे वसुली गॅंगने हजारो कोटी रुपये कमवले; ईडी, इन्कम टॅक्सने याचा तपास केला पाहिजे’
- वाढदिवसाच्या आदल्या दिवशी टीम इंडियात स्थान ; कृणालनं शेअर केली भावुक पोस्ट
- ‘फडणवीस… उगाच लांब जीभ काढून तुम्ही केलेल्या आक्रस्ताळेपणावर कुणी काडीचा विश्वास ठेवत नाही’


