Share

शिवसेना भाजप वादावर आठवले म्हणाले, “हे तर कुत्र्या-मांजराचं भांडण, पण…”

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया असतानाच आता केंद्रीय मंत्री रामदास (Ramdas Athavale) आठवले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले म्हणाले, “हे तर कुत्र्या-मांजराचं भांडण आहे. पण कोण कुत्रा आणि कोण मांजर हे पहायला पाहिजे. हे भांडण मात्र मिटलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी त्यात पुढाकार घ्यावा आणि संजय राऊत यांना समज द्यावी. अपशब्द वापरण्यापेक्षा किंवा शिवराळ भाषा वापरण्यापेक्षा महाराष्ट्राची मराठी संस्कृती जपली पाहिजे.”

तसेच दोन्ही काँग्रेसमुळे शिवसेनेचे पुढील निवडणुकीत मोठं नुकसान होणार आहे. आम्हाला काही सत्तेची आवश्यकता नाही. आता अडीच वर्ष होत आलेली आहेत. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर शिवसेना विचार करत असेल आणि बीजेपीही त्या फॉर्म्युल्यावर तयार होऊ शकेल. पण सध्या तरी शिवसेनेचं तसं काही चित्र दिसत नाहीये. असा दावाही आठवले यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!