🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र लिहित मागणी केली आहे. दहिसर पूर्व-पश्चिम आणि अंधेरी पूर्व-पश्चिम या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात यावे, अशी मागणी भातखळकर यांनी पत्र लिहून केली आहे.
तसेच मुंबईच्या मेट्रो विकासात आणि दोन वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केलेल्या या कामात त्यांचा सिंहाचा वाटा असून त्यांनाही सन्मानाने याच्या उद्घाटनाला बोलावण्यात यावे, अशी मागणीही अतुल भातखळकर यांनी केली आहे. याबबत त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.
मुख्यमंत्री महोदय, कळकळीची विनंती!!! यावेळी तरी मनाचा कोतेपणा दाखवू नका… pic.twitter.com/lrLzuwufpZ
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 22, 2022
तसेच मुंबईतील मेट्रो विकासात केंद्र सरकारचे महत्वाचे योगदान आहे. त्याचबरोबर मुंबईत मेट्रो प्रकल्पासाठी फडणवीसांचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत फडणवीस सरकरने केलेले प्रोजेक्ट आपल्या नावाने उद्घाटन करून आपल्या मनाचा कोतेपणा दाखवू नये, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शरद पवार भीमा कोरेगावप्रकरणी आयोगासमोर हजर राहणार; नवाब मलिकांची माहिती
- रशिया-युक्रेन युद्ध; अमोल कोल्हे यांनी केली मोदींकडे ‘ही’ मागणी
- ‘दिशा सालीयन केस प्रकरणात घटनेचा अहवाल ४८ तासांत सादर करा’ – रुपाली चाकणकर
- VIDEO : अनसोल्ड झाल्यानंतर रैनाची बीसीसीआयला विनंती भावनिक होत म्हणाला…
- Russia-Ukraine Crisis:रशियाने युक्रेनमध्ये सैन्य हलवले; जाणून घ्या सविस्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
