Share

आरसीबीचा स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरची जागा घेणार ‘हा’ वेगवान गोलंदाज 

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरीत हंगामाला सुरुवात होण्यासाठी काही दिवसाचा अवधी शिल्लक आहे. यादरम्यान अनेक संघाचे खेळाडू युएईत दाखल झाले आहे. यादरम्यान बंगळुरु रॉयल्स चॅलेंजर संघातुन एक वाईट बातमी समोर आली होती.

आरसीबीचा महत्वाचा अष्टपैलु खेळाडू वॉशिंग्टन सुंदर आयपीएल स्पर्धेमधुन बाहेर पडला आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना सराव सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतला होता. यादरम्यान त्याने बोटाच्या दुखापतीवर उपचार घेतले. मात्र आयपीएल स्पर्धेपुर्वी त्याची जखम पुर्णपणे बरी होण्याची शक्यता मावळली असल्याने त्याने आयपीएल २०२१च्या दुसऱ्या सत्रातुन माघार घेतली आहे.

आता आरसीबीने स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरच्या जागी बंगालचा वेगवान गोलंदाज आकाश दीपला संघात स्थान दिले आहे. आरसीबीने एक निवेदन जारी केले आहे, टीम अष्टपैलू वॉशिंग्टन दुखापतीमुळे आयपीएल 2021 मधून बाहेर राहील. त्याच्या जागी बंगाल राज्य क्रिकेटपटू आकाश दीपला घेण्यात आले आहे. असे निवेदनात लिहिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!